बाप लेकीच नातच काही वेगळ असतं
शब्दात सांगूनही ते व्यक्त होत नसतं
कवितेतून अव्यक्त ते भाव व्यक्त होत असतं
बाप लेकीच प्रेम हे जगा वेगळच असतं
लेक जमल्यावर एक वेगळीच खुशी बापाला असते
बापाच्या पाठीवरती घोडा म्हणून खेळताना लेक खुदकन हसते
खेळतांनी लेकीला लागलं की बाप लगेच मलम लाऊन देते
म्हणूनच बाप लेकीच नातच काही वेगळ असते
चिमुकली बापाची लाडकी जेव्हा बापाला चहा बनवून देते
तेव्हा लेक मोठी झाली म्हणून बापाच्या डोळ्यात अश्रु येते
बापाची तब्बेत खराब असताना मायेनी डोक्यावरून हाथ ती फिरवते
म्हणूनच बाप लेकीच नातच काही वेगळ असते
छोटीशी चिमुकली कधी लग्नाच्या वयात येते हे बापाला कळतच नसते
कारण त्याच्यासाठी ती तर लहानशी बाहुलीच असते
लग्न मंडपात लेक उभी होताच बाप कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो
म्हणूनच बाप लेकीच नातच काही वेगळ असते
स्नेहा सोनी
गुजरात