Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on March 11, 2020, 07:23:13 AM

Title: बंद खोली
Post by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on March 11, 2020, 07:23:13 AM
*शीर्षक.बंद खोली*

तुझ्यासाठी लिहितांना
तुझ्यासाठी जगतांना
विरोध कधीच नव्हता घरच्यांचा
खेळ मांडून गेलीस तू
अन फायदा झाला परक्यांचा
तू जवळ असल्यापासून
अन तुझ्यात फसल्यापासून
बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून

डोळ्यातून आलेल्या
पाण्याची खून तशीच आहे
तुझ्यामुळे आलेली
काळजातली धून तशीच आहे
हिरव्या हिरव्या पानांतून
नभातल्या नखशिखांतून
ओळख तुझी काळजात बसल्यापासून
अन तुझ्यात फसल्यापासून
बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून

लिहावं कधी तरी
निवांत बसावं कधी तरी
अडगळीत लपून ठेवलेल्या
तुझ्या भेटवस्तूनां पहावं कधी तरी
म्हणून जरासं जवळ येऊन
जरासं बावर होऊन
तुझ्या आठवणीना ओरखडे घेतो
आसवांना फाटे देतो
खरे प्रेम डसल्यापासून
अन तुझ्यात फसल्यापासून
बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून

मी जातो कधी कधी तिथे
आई बाबांना खोटं बोलून
त्यांना माहीत असतांनाही
त्यांचा एक एक शब्द तोलून
तुला काहीच माहीत नाही आता
मी कसा वेडा झालो
तुझ्या प्रेमाची इंगळी डसल्यापासून
अन तुझ्यात फसल्यापासून
बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून

मी म्हणायचो कधीच प्रेम नाही करायचं
जितकं जगलो तितकंच उरायचं
तू आलीस सारा घोळ झाला
प्रेमाचा नवीन विषय आला
या भानगडीत नव्हतं पडायचं
ठरवलं होतं आपलं नाव घडायचं
आता काहिच आठवत नाही
मी शेवटी मेल्यापासून
अन तुझ्यात फसल्यापासून
बंद खोली तशीच आहे तू गेल्यापासून

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर