तुझ्या येण्याने प्रेमाची भाषा मला कळाली,
अन तुझ्या येण्याने आयुष्याची किंमतही कळाली,
आयुष्य खूप सुंदर होत माझं तू येण्याआधी,
पण तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला खरी दिशा मिळाली.
तू जेव्हा हसायची खूप सुंदर दिसायचीस,
काय सांगू तेव्हा तुझ्यापुढे चांदणी हि फिकी असायची,
आजही तडफडतोय मी तुझ्या त्या प्रेमळ हाश्यासाठी,
अन जीव माझा झुरतोय फक्त तुझ्यासाठी
तुझा जीव मात्र माझ्या साठी कधीच झुरणार नाही,
अन तुला या वेड्या चे प्रेम कधीच कळणार नाही,
आयुष्यभरासाठी साथ द्यायचीच नव्हती माझी तुला,
तर का ग वेडे तुझ्या प्रेमात पाडलं मला?
तुझ्या येण्याआधी ही एकटाच होतो मी,
अन तू गेल्यावर ही एकटाच आहे,
फरक एवढाच, तेव्हा हसत होतो मी,
आज मात्र तुझ्या आठवणीत रडत आहे.
नसशील तू माझी तरी,
प्रेम तुझ्यावर करत राहीन,
अन पिल्लू तुझ्या सुखासाठी,
हजारो जन्म मरत राहीन...
G / M
अधिक माहिती कोठे शोधावी या मनोरंजक कथा