*अनोळखी* ❤
तुझी माझ्या जीवनात येण्याची
हलकीशी चाहूल मज लागली
अनोळखी स्पर्शात त्या
अनेक जन्मांची ओळख पटली
Stranger म्हणता म्हणता तुजसमोर
मी पाने मनाची विखरत गेली
तुझ्या प्रेमळ नजरेत गुंतून जाता
अनेक जन्मांची ओळख पटली
अनोळखी चेहऱ्यात त्या
आपलेपणाची भावना उमटली
हाती हात तू सावरायला देता
अनेक जन्मांची ओळख पटली
मन माझे वेडे तुझ्या नजरेला बोलू लागले
अबोल ओठ मग प्रश्नमंजुषा छेडू लागली
त्याच्या नजरेने मलाच माझी नव्याने ओळख करून दिली
त्याच्या एका भेटी मध्ये अनेक जन्मांची ओळख पटली
©कृतिका