Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Falguni Dhumale on April 10, 2020, 11:01:08 AM

Title: .....जर तुलाही माझ्यावर प्रेम झालं असतं.
Post by: Falguni Dhumale on April 10, 2020, 11:01:08 AM
चुकीच्या मार्गावर जाताना तू मला अडवलं असतं...
अडखडल्या पावलांना धीराने सावरलं असतं..
पडलेच डोळे आसवांना, वाहताना थांबवल असतं.. 
माफ़ करून नव्या उमेदीने मला जगायला शिकवलं असतं..
तुझ्या असण्याच्या खुशीने मला सदा मोहोरलं असतं..

तू असतास तर मला हरवून शोधलं असतं..
थांबुन मनाच्या कोपऱ्यात घर करून ठेवलं असतं..
वेड्यागत वागण्याचं हसून कौतुक केलं असतं ..
गालावरच अलगद हसू, उधाण येऊन बहरलं असतं ..
अनोळखी वळणावर एकत्र चालताना, नातं उभारून आलं असतं..

तू मला मी तुला सर्व काही परिपूर्ण असतं..
जगण्याच्या गुपितात कश्याचंही बंधन उरलं नसतं..
दु:खाच्याही कठोर क्षणांना अमृत म्हणून पिलं असतं..
सुखांच्या अनमोल क्षणांच पुडकं आयुष्यभर पुरवलं असतं..
चालत-बोलत , हसत-रुसत, सोबत मोठे झालो असतो..
सोबत जगुन मरणाचं स्वप्न सुद्धा सोबत बघितलं असतं..

कुणालाही हेवा वाटावा असं नातं सोबत करून जपलं असतं..
तुझ्यासवे मोठे होताना, स्वत:ला भाग्यवान मानलं असतं..
तू माझा असावा यासाठी, सर्व काही हारलं असतं ..
तुझे असण्याच्या जाणिवेने, मला माझ्या पासून हिरावालं असतं..
तुझं बनुन राहतांना, हे जगणं सुंदर झालं असतं..
आज काही वेगळा असता, जर तुलाही माझ्यावर प्रेम झालं असतं ..



- फाल्गुनी