सांज थवे (कवी: सचिन निकम, मुरादमन)
वेदनांची गीते झाली
स्पंदनांचे सूर हे
आसवांच्या सरी बरसल्या
भावनांचे पूर हे
कुठे दूर राहिले
गाव माझे दिसेना
मिसळलो परक्यांत तरीही
आपुलकीने कुणी पुसेना
आठवणीँची पाने चाळता
गुंतले का मन इथे
मिटुनी डोळे येईल का
जाता जिथे हवे तिथे
सुकल्या झाडाला फुटली
चैतन्याची पालवी
आला बहर वसंताचा
स्पर्श लाभला मौलवी
सावलीला थांबू कुठवर
आता मज निघाया हवे
वाट पाहतय कुणीतरी
परत फिरले सांज थवे.