Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: bpandurang01 on April 14, 2020, 12:48:26 PM

Title: “निसर्गाचा पलटवार”
Post by: bpandurang01 on April 14, 2020, 12:48:26 PM
   "निसर्गाचा पलटवार"

संत गाडगेबाबांचे ग्राम स्वच्छता अभियान गुंडाळून ठेवले आम्ही पेटीत
पाणी अडवण्याचा जिरवण्याच्या फक्त घोषणा अन वृक्षारोपनाचे प्रदर्शन केले आम्ही ऐटीत

जिथे सोच तिथे शौचालय अन निर्मल भारत अभियान आम्हास पचनी पडले नाही
अन ओढा नाला पांदी वा पटरी ला गेल्या शिवाय आमचे पोट साफ झाले नाही

अथांग समुद्राचा घोटत गळा बांधले आम्ही गगनचुंबी, टोलेजंग टॉवर
अमर्याद बांधकाम, खाणकाम, अमर्याद कारखानदारी अन अमर्याद पॉवर

भरघोस पिकाचा हव्यास, केला आम्ही रासायनिक खतांचा अतिरेक
खारवटवल्या जमिनी अन उभारले प्लास्टिकचे डोंगर सोडून सारा विवेक

हवा बाटवण्याचा करत कळस पाडले आम्ही ओझोन ला भगदाड
पृथ्वीच्या पोटात फोडले अणुबॉम्ब,आमची माणुसकी झाली मुर्दाड

आम्हीच नासवला समुद्र करून त्यात रसायन अन इंधन गळती
अन पर्यावरण संवर्धनासाठीचा निधीही आम्ही केला हवा तिथे वळती

सागरी जीवसृष्टीचा केला आम्ही नायनाट करुन टॉरपेड चे हल्ले
वापरत आण्विक  अन जैविक अस्त्रे केले आम्ही बेचिराख जिल्हे

आम्हीच लावतो कृत्रिम वणवे अन करतो अगणित झाडांची खाक
अन फावल्या वेळात करतो पर्यावरणाच्या गोष्टी वर करून नाक

अन्नसाखळीचे  दाखवत पालुपद आम्ही प्राणी पक्षी मारून कापून खाल्ले
विचार ही नाही केला की ही असतील कदाचित आपल्याच निर्मिकाची पिल्ले

शतकानूशतके एकी करून केली आम्ही निसर्गाची हवी तशी  दुर्दशा
उसके घर देर है अंधेर नही, अन
अन आज नशिबी अली आमच्या अन्नान्न दशा

निसर्गाचा पलटवार झेलत आज दुरूनच करतो नमस्ते राखून एक मीटर की दुरी
निर्मिकासम निसर्गाचे पावित्र्य जपण्याचे स्वप्न आता तरी बाळगु  उरी"

प्रा. डॉ पांडुरंग वि बरकले
इंग्रजी विभाग प्रमुख
श्रीम.ना दा ठा महिला महाविद्यालय
चर्चगेट मुंबई 400020.
09371828156