Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: Hanmant Chavan on April 15, 2020, 10:34:11 PM

Title: Corona
Post by: Hanmant Chavan on April 15, 2020, 10:34:11 PM
कोरोना ने घातले थैमान रे
जग झाले परेशान रे..

कोरोना ने घातले थैमान रे
जग झाले परेशान रे....
कसला विषाणू आला हया भूतलाव रे
जग झाले परेशान रे....

काय खावे याचे राहिले न भान
एक छोटासा विषाणू उडवी भूक नी तहान
अन्नासाठी झालेत सारे फस्त रे
कोरोना ने केले जीवन उधवस्त रे

जीव घेणा आजार आला तुमच्या दारी रे
नका निघू तुम्ही घराबाहेर रे
नाही लस कोणती नाही उपाय
घरी राहने हा एकच पर्याय रे

कोरोना ने घातले थैमान रे
जग झाले परेशान रे..

© हनुमंत चव्हाण