Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on April 17, 2020, 11:48:31 AM

Title: का फुलांनो
Post by: कवी अमोलभाऊ शिंदे पाटील on April 17, 2020, 11:48:31 AM
*शीर्षक.का फुलांनो*

आज अनोळखी दुःखाचे
नजराणे गळ्यात माळतांना
अंधार कोणाला थांबवतो
कोंडलेले श्वास संभाळतांना

दुर्लक्ष झालं सारं काही
जरी देवानं दिली ग्वाही
मी न कोणाचा अन तू ही
उगाच स्वप्न सुखाचे पाही

वाऱ्याची झुळूक घेऊन आले
ओसाड माळरानावर पाणी
चिमुक काटे टोचले कशाला
गात असतांना विरह गाणी

का फुलांनो वाट पाहिली
माझ्या मरणाची निरंतर
जेव्हा चंद्राचा अस्त झाला
तेव्हा मरणाला मिळाले उत्तर

देह झाकला कोण्या कापडाने
नात्यात आला अनोळखी कोणी
वेगळा वाटला तो फुले वाहणारा
अन सरण रचणारे ते हात दोन्ही

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर