कलिका
कळी होती आधी सुगंध लेवून आली
अचानक पहाटे पहाटे दवात नाहली
लाजरी अल्लड कोवळी जरा बावरी
पाहता पाहता भोवती दरवळून गेली
रानोमाळी घमघमाट पसरता हलका
वाऱ्यासोबत भ्रमरांची मसलत झाली
पाहूनी वर्दळ भ्रमर न् फुल पाखरांची
कलिका नवथर नाजूक हरखून गेली
एक एक प्रहर सरता दिवस निजला
हलके अर्पून स्वगंध तीही कोमेजली
©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९