फेसबुक वरची मैत्रीण
फेसबुक वरती तिला
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली
ना ओळख ना पाळख
तरी तीने अक्सेपट केली ||
सुरुवात झाली बोलायला
बोलल्याशिवाय करमेना
नकळत मैत्री झाली
कधी कळलेच नाही ||
मैत्रीचे रूपांतर कधी
एक तर्फी प्रेमात झाले
कधी मला समजलेच नाही
तिच्या वाचून राहवलेच नाही ||
तिच्या अप्रत्यक्ष बोलण्याने
मला रहावलेच नाही
बोलता बोलता केला प्रपोज
मात्र दिला तिने नकार ||
तिने दिलेला नकार
मला पचलास नाही
वारंवार केला प्रपोज तिला
मात्र होकार दिलाच नाही ||
नकाराच कारण मात्र
तिने मला सांगितले
तिला होता पूर्वी बायफेंड
त्या दुःखातून सावरली नाही ||
वारंवार तिने नकार दिला
पण नाही मैत्रीला धोका दिला
बोलते माझ्याशी मैत्रीन म्हणून
सदा राहिल मैत्रीन म्हणून ||
कवी: हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव ता. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. ९८३४२०९९२७