सोडून गेले.....
स्वप्न ही आयुष्याची वाट सोडून गेले,
अश्रु पण पापण्यांची साथ सोडून गेले।
जे होते वाटेवर् सुख दुखाचे साथी
मार्ग कठिण होताच, हात सोडून गेले,
निशब्द अंधार,सोबतीला
फक्त उसासे- उमाळे
चंद्र-चांदण्याही काळोखी रात सोडून गेले
अश्रु गळलेले, वाळलेले ऊशीवर
गर्द तिमीर-लाटांच्या कुशीवर
स्वप्नसुमने ही दुखाची वास सोडून गेले
नागमोडी वळणावर वळलेला
विसाव्यांच्या सावल्यांनी छळलेला
अगणित वळणे ही मनावर आघात सोडून गेले
मार्ग कठिण होताच, हात सोडून गेले.
मोतिदास अ. उके 'साहिल'
१/९/२०२०