ओलेता किनारा
तुझ्या आठवांचा एक ओलेता किनारा
नकळत पावलांना माझ्या देतो सहारा
पहुडलेत निशब्द गंध ठसे वाळू वरती
ठेवूनीया अस्तित्वाच्या लाटांवर पहारा
खरेच ते ओळखीचे अल्लड समुद्र पक्षी
चाहूलीने हळूच पावलांच्या देती इशारा
सोडता किरणांनी मावळतीस रंग जादू
लाटांवर डोलतो मग सोनवर्खी पिसारा
मंदमंद गार वाऱ्यावर अस्ताच्या लाघवी
लाभतो हवासा मनाला आगळा निवारा
©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९