Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: मोतिदास उके साहिल on October 04, 2020, 11:15:48 AM

Title: नैराश्यच उरात आहे
Post by: मोतिदास उके साहिल on October 04, 2020, 11:15:48 AM

नैराश्यच उरात आहे

हातावर सुखाची रेषा नाही
ओठांवर प्रीति ची भाषा नाही
जीर्ण स्वप्नांची सल सुरात आहे
चेहरा हसरा असला तरी
नैराश्यचं उरात आहे,

मार्ग खळतर,
वळणा- वळणावर काटेचं
प्रवास सोडून
निवांत बसावे वाटेत ?
माझी अशी हिम्मत नाही
हरलेल्यांची किम्मत नाही
संघर्षाची अर्धि कोर
अजून ही पदरात आहे
चेहरा हसरा असला तरी
नैराश्यचं उरात आहे.

मोतिदास अ.उके 'साहिल'
४/१०/२०२०