*शीर्षक.आवडलोच होतो तुला तर*
अगं आवडलोच होतो तुला तर का टाळत गेलीस
उभ्या आयुष्याची राख करण्या का जाळत गेलीस
किती उखाणे घेतले असशील मला माहित नाही
अस परकं करून प्रेमाची फुलं का माळत गेलीस
नाळ नशिबाची जोडणार नव्हतीस माहीत होतं मला
तुला बोलायचं असून देखील तू मौन का पाळत गेलीस
तुझ्या आयुष्याची माझ्या आयुष्याशी तुलना झाली नाही
सोबत द्यायची नव्हती तर जखम का साळत गेलीस
जग मनसोक्त वेगळ्या जगात तुझ्या मी टोकणार नाही
जरासे हसू होतं चेऱ्यावर जातांना ते ही चाळत गेलीस
✍️(कविराज अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९०० .अहमदनगर