तुझेच् प्रेम उरावे....
मनाच्या आधारासाठी तुझे,
प्रेमाचे खांदेही पारखे झाले
मनसोक्त रडण्यासाठी
तुझे,डोळेही असावे ओले ?
हरलेली खेळी जीवनाची
सावरता ना सावरली
आठवण तुझी सांझवेळी
आवरता ना आवरली,
आता भरलंय डोळ्यांत
अश्रुंचे पाणी काठोकाठं
त्यात बुडविल्या काळजातल्या
आठवणी एका पाठोपाठं,
मरे पर्यंत जगावे की
जगत जगत मरावे ?
मेल्यानंतर ही हृदयात
तुझेच् प्रेम उरावे.
मोतिदास अ उके 'साहिल'
२४/११/२०२०