कस म्हणावे देव आहे
अजुनही प्रसादा वरुन दलितांना मारतात
प्रसाद अन्न मुलाला गटारा शेजारी चारतात
स्वताला श्रेष्ट समजुन इतराना दुर तारतात
खरा एक देवरुप जन्मला भिमराव भारतात
हमेशा श्रेष्ट जातीचे महारांना खाली टाकतात यांच पाप हे पैशाने गुपचुप लगेच झाकतात
यांना बाट होतो अन बौद्ध कामाला लागतात
मानसावर थुंकन हे कोनते देवधर्म सांगतात
संविधाना समोर कसे देव धर्म सर्व पांगतात
देव सोडुन आरोप्यांना जेलात कसे टांगतात
का बरे श्रेष्ट मानस सैताना समान वागतात
अन अजुनही सविधानाच आरक्षण मागतात
मंदिर बनवताना कामाला महार असतात
मंदिर बनवल्यानंतर त्या वर प्रहार असतात
हर कामाला मंदिराच्या महारच दिसतात
मंदिराच्या दर्शनाला महार कधीच नसतात
(कवी) रंजित आंबादास सदर
मो 9579868748
खर सांगायच म्हणजे मी काय जाती वादी
मनुष्य नाही पण काही खेड्यापाड्यात अशी परंपरा संध्या चालु आहे
श्रेष्ट जातीचे लोक महार लोकांना घरी
प्रसादासाठी बोलवतात आणि एका गटाराच्या शेजारी त्यांना जेवायला बसवतात
मी स्वतः अनुभवल आहे .
उत्कृष्ट लेखन, थोडे अजुन लिहा