Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: कदम on May 24, 2021, 11:27:50 AM

Title: कविता-आब्रु
Post by: कदम on May 24, 2021, 11:27:50 AM
________________________________
आब्रु
________________________________

आब्रु हा शब्द मनाचा ठाव घ्याला लावते
तिचा अर्थ वर वर लागत नाही
पण आब्रु जाते तेंव्हा काहीच उरत नाही
असते तोपर्यंत मोकळं जगु शकत असतात
असंच काही बाही
आब्रु मनाचा विचार असते
आब्रु स्वभावातील अधिकारी असते
आब्रुच असते जी व्यक्तिमत्वाचा विकास करते
आब्रु मागून निघत असते न मागता वाढत असते
आब्रु हे असे पोशाख असते
जे उसवले कि उसवतच जाते
त्यानंतर उघडी झालेली आब्रु झाकणे
स्वतःच्या तर हातात नसते
आब्रु सोडलेल्याच्या लोकांना
गबरू मनवले जाते आणि हिणवले जाते
शेवटी आब्रु देणारे लोकच असतात कारण ती बाजारात विकत मिळत नसते
--------------------------------------------------
-कदम.के.एल.