हर शेपटेचा प्राणी गाढवंच नसतो
माणसाला माणूस त्रास देत असतो
कोणी कोणाच्या डोक्यातच बसतो
कपट आतून वरून जोरातच हसतो
हर शेपटीचा प्राणी गाढवंच नसतो
श्रीमंताला वाटे गर्वाची मोठी मालकी
आपलीच कुठेही वाजवितो ढोलकी
गरीब गरीब असून माणसं ही बोलकी
गरीब माणूस पण राव गाढवंच नसतो
हा तोच श्रीमंत दाखवे जगाला छाती
सांगे माझ्या छातीवर केस बघा किती
कपटाची गावात सर्व अशी राजनीती
श्रीमंता हर शेपटेचा प्राणी गाढवंच नसतो
कवी रंजित आंबादास सदर.
रंजित सर, या कवितेतून आपण गरीब आणि श्रीमंतांची सुंदर व्याख्या सांगितली आहे. सदर "हर शेपटेचा प्राणी गाढवंच नसतो ", या कवितेत श्रीमंताची मुजोरी, व गरिबांनी मुकाट सहन करावे, असे आता घडताना दिसत नाही. गरिबांना आता वाचा फुटली आहे, त्यांनी श्रीमंतांच्या या गर्व, माज, कपट, स्वार्थ अश्या बऱ्याच समाज विरोधी वृत्तींना आता उत्तर देण्याचे ठरविले आहे.
त्यांनी मुकाट सहन करावे, गाढवासम गप्प, चुप्प जुलूम सहन करावेत, हा त्यांचा स्वभाव त्यांनी आता सोडून द्यावा, असे कवीस प्रकर्षाने वाटते, व तो या गरिबांना या जुलुमा विरुद्ध पेटून उठण्यास सांगत आहे.काहीशी विनोदाची झालर असलेली हा कविता, आजच्या समाजावर प्रकाश-झोत टाकून जाते. असो, कविता आवडली, त्यातील मार्मिक विनोद कळला.
गरीब गरीब नाही राहिलाय
श्रीमंताची मक्तेदारी गेलीय तळाला
गरिबांनाही हक्कांची होऊन जाणीव
आज तोही पेटून उठला.
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०१.०६.२०२१-मंगळवार.