वास्तव -चारोळ्या
"ओझे" - (भाग-१)
----------------
1) स्वतःचेच ओझे वाहून थकलोय
कुणालाही नाही द्यायचाय बोजा
यापुढेही जीवन असेच जगायचे
जमल्यास घ्यायची साऱ्यांची रजा .
2) हेच सार आहे जीवनाचे
ओझे बाळगत वहात चालायचे
थकत , खुरडत, पावले ओढत
पण चालणे नाही थांबवायचे .
3) सुरुवात वेगळी झाली होती
दिवस होते मुक्त उडण्याचे
आता वार्धक्याने पंख छाटलेत
वजनही सहवत नाहीय ओझ्याचे .
4) पावले भरकटलेली , अंतहीन दिशा
नाही राहिलीय कोणतीच आशा
एकट्याचाच प्रवास , सोबती नाही
आयुष्याचे ओझे सात्यताने वाही .
5) काय तुझे आणि काय माझे ?
शेवटी काय राहील दोघांचे ?
इतःपर नाही गवसले सुख
ओझेच वाहिले दुःखाच्या डोंगरांचे !
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.06.2021-शनिवार.