मित्र/मैत्रिणींनो,
"आजची सत्य अन विदारक परिस्थिती"-----------------
"अरे,कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र ? " मित्रानो, काहीतरी सत्य आणी तथ्य असावे यात, नाहीतर उगीचच कुणी जीवाचा आकांत करून हे उद्गार काढणार नाही.
तर माझ्या पुढील चारोळीत मी तुमच्यापुढे अशीच सत्य परिस्थिती , आजचे भयानक वास्तव मांडणार आहे, आणी तो बदलायचा एकच अंतिम उपाय म्हणजे होणाऱ्या निवडणुकांत योग्य त्या पक्षास निवडून द्यायचे, जो जनतेच्या हिताचे पाहिलं, जनतेच्या अडी अडचणींना उभा राहील. त्यांचे हित चिंतेल. आतापर्यंत खूप भोगलंय सामान्य माणसाने. आता बदल होणे ही काळाची गरज आहे. आणि जर का असंही घडलं नाही, तर सामान्य नागरिक हा बंड करून उठेल, तो स्वतःचे सुराज्य, स्वराज्य निर्माण करू पाहिलं. आणि मग हे करण्यापासून त्याला कुणीही अडवू शकणार नाही.
मित्रानो, ऐकुया तर माझे खालील चारोळीतले विद्रोही विचार---
"आजची सत्य अन विदारक परिस्थिती"
---------------------------------
( १ )
स्वार्थांध मानव होतोय दानव
कुणी नाही आज कुणाचा वाली
उघड-उघड आगडोंब उसळतोय अत्याचारांचा,
नाही कुणाकडे उत्तर याचे, नाही कुणी सवाली.
( २ )
मन द्रोह करून उठलंय
पण विचार कुणाकडे मांडायचे ?
साऱ्यांचीच मने झालीत कलुषित,
कुणाच्या हक्कांसाठी, कुणाकडे भांडायचे ?
( ३ )
बंडाचे हत्यार गेलंय थिजून
धार त्याची गेलीय विझून
लकलकताहेत हत्यारे आधुनिक हत्याऱ्यांची,
अमुच्या रक्ताने उसळणेही बंद केलंय !
( ४ )
आदर्श तसबिरी भिंतीशी लटकताहेत त्यांच्या
मार्गदर्शन कुणीही करत नाहीय
परखड विचारांची झालीय माती,
स्वतःशीच करतेय विद्रोह, स्वतःचीच मती.
मित्रानो, आता यापुढे हे चित्र बदलायला हवे.
आपले स्वराज्य यायला हवे.
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.06.2021-मंगळवार.