"वात्रटिका"
----------
(1) ऑक्सिजन पार्लर
---------------------
सर्व झाडांनी एकत्र येऊन
मानवा -विरुद्ध एकजात बंड केला
ऑक्सिजनचा हक्क हिरावून घेतल्यामुळे
त्यांनी रात्रं -दिवस कार्बन -डाय -ऑक्साइड सोडला.
(2) पे चॅनेल्स
--------------
100 चॅनेल्स नाही पुरत पाहण्यास
म्हणून मी लावून घेतले पे -चॅनेल्स
महिनाभराने आली नोटीस पैसे भरण्याची
सोबत आले होते प्रचंड बिल .
(3) व्हियाग्राची भावंडे
---------------------
एकदा व्हियाग्राची भावंडे हरवली शाळेत
म्हणून तपास होता चालला जोरात
पानाग्रा सापडले शेवटी विद्यार्थ्यांकडे , इंडियाग्रा विद्यार्थिनींकडे
तर सिलाग्रा सापडले चक्क बाईंच्या हॅन्ड -बॅगेत .
(4) मैदानावर नंगा -नाच
------------------------
अहो , खेळाकडे ध्यान कुणाचे होते
सिक्सर मारा वा सेंचुरी , कोणाला त्याचे काहीच नव्हते
नग्न स्त्री -पुरुष धावत कधी येताहेत मैदानात
याकडेच प्रेक्षकांचे लक्ष्य लागले होते .
(5) बुरख्यातील ममता
----------------------
सिने -पाक्षिकाच्या मुख -पृष्ठावर
ममताने घडवले होते उत्तान दर्शन
आता कोर्टाची करतेय वारी ,बुरखा घालून
देव -पूजेला लागलीय वाटतं, करून सवरून .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.06.2021-रविवार.