त्र/मैत्रिणींनो,
बऱ्याच दिवसांपूर्वी एक बातमी यु-ट्यूब व्हिडीओ वर पहिली होती ,की हाय टेक प्रोफाइल, महिलांचे मसाज पार्लर रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करून, त्यातील सर्व गुन्हेगारांना अटक केली होती. मसाज पार्लरच्या नावाखाली, अनेक अवैध काळे-धंदे चालल्याचे उघड झाले होते. या समाज विघातकानी आपल्या रॅकेटने सर्व मुंबईही पोखरली होती. वेळीच पोलिसांनी धाड टाकून त्यांचा पर्दाफाश केला. त्यांचं खरं कौतुक करावयास हवं .
समाजाला लागलेली ही कीड किती विषारी आहे, हे आपण सारे जण जाणून आहोत. याचा समाजावर किती घातक परीणाम होतोय, हे आपण पाहातोच आहोत. अशी अनेक कितीतरी समाज विघातक कामे होत आहेत, हे आपणास माहीतच नाही, आपण यापासून पूर्णतः अनभिज्ञ आहोत. वेळीच या गोष्टीना आळा घालावयास हवा, नाहीतर ही विषवल्ली, ही त्यांची कृष्ण -कृत्ये, साऱ्या समाजास समूळ पोखरून टाकल्याशिवाय राहाणार नाही. आपणही आपल्याकडुन या गोष्टींचा निषेध व्यक्त करून त्याविरुद्ध आंदोलने करून, समाजाचा एक सुजाण नागरिक म्हणून कार्य करायचा प्रयत्न करूया.
ऐकुया तर उपरोक्त विषयावरील एक गंभीर कविता. कवितेचे शीर्षक आहे - " हाय प्रोफाइल टेक, महिलांचे मसाज रॅकेट "
गंभीर सामाजिक विषय कविता
" हाय प्रोफाइल टेक, महिलांचे मसाज रॅकेट "
----------------------------------------
मसाज पार्लरना आलीय बरकत
आधी तिथे कोणीच नव्हते फिरकत
जेव्हापासून हातभार लागलाय महिलांचा,
जथा भरलाय दाराबाहेर, पुरुषांचा .
प्रथम-दर्शनी तरी पाहून वाटते
येथे मसाज (मौलीश) करून मिळते
पण अंतर्भागाचे चित्र वेगळे असते,
पडद्या -आड अवैध अति-रंजित चित्र दिसते.
निमित्त मसाजाचे दाखवून वरकरणी
महिला चालवितात मसाज पार्लर रॅकेट
कोठेना कोठेतरी धागा जुळून,
त्यांचे असते कृष्ण-धंद्यांशी ब्रॅकेट.
मसाजच्या नावाखाली, स्पाच्या नावाखाली
मासा धनीक लावायचा गळाला
आणि हळू-हळू कृष्ण-कारभाराने
सुरुवात करायची माल उकळवायला.
हाय प्रोफाइल टेकचे नाव वाचतात
वाचणाऱ्यांचे लगेच डोळे फिरतात
बडे मासे, छोटे मासे मग अलगद,
या महिलांच्या हाती सहज लागतात.
चकाचक दुकानाच्या, टकाटक जाहिरातीला
मसाज-वर्ग येतो चालत आपोआप भुलून
या हाय प्रोफाइल टेकच्या नावाखाली,
प्रोफेशनल महिला लुटती हस्त-कौशल्य दाखवून.
चालतोय धंदा तेजीत, आलीय बरकत
पोलीस खात्याच्या डोळ्यांवर सहज पट्टी चढवत
पण कितपत चालणार हे कृष्ण-कृत्य ?
उघडकीस आलंय त्या कृत्यांचे हे भयानक कृत्य !
राजरोस चालायचे हे रॅकेट, सरसकट
पोखरली गेलीय मुंबई, इथे फुकट
पण पोलीस-खाते झालंय अति-दक्ष,
आता नाही घेत ते कोणाचाही पक्ष.
उघड होताच काळे धंदे त्यांचे
ठोकल्या गेल्या त्यांना बेड्या
मसाज घेणाऱ्याना अन मसाज देणाऱ्यांना,
आता बसतील तुरुंगात छड्या.
कृष्ण-कृत्ये अशी यावीत उघडकीस
वाचवूया अवैध धंद्यांपासून आपल्या मुंबईस
या-विरोधी आंदोलने आजच सुरु करूया,
या देशाचा प्रामाणिक, सुजाण नागरिक बनूया.
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.06.2021-बुधवार.