मित्र/मैत्रिणींनो,
पहिल्या स्पर्शात काय जादू असते, काय भावना दडलेल्या असतात, हे त्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी जीवानाच विचारा. नजरेला नजर भिडल्यावर, प्रथम प्रेमाची कळी मनात उमलते . त्याच्या पुढची पायरी म्हणजे शब्द, शब्दांतून ते प्रेम फुलत जाते. आणि त्यानंतर येणारी महत्त्वाची पायरी म्हणजे स्पर्श, या स्पर्शातच या प्रेमी जीवांच्या प्रेमाची सांगता असते. प्रेमाचे पूर्ण फुलात रूपांतर होण्यास, प्रेम-कळीचे सुमन होण्यास, हा स्पर्शच जबाबदार असतो.
ऐकुया, तर हा स्पर्श त्या प्रेमी जीवांच्या मनात, शरीरात काय बदल घडवतो, त्यांना काय अनुभूती येते, माझ्या प्रस्तुत प्रेम कवितेतून. कवितेचे शीर्षक आहे - "स्पर्श हा पहिला वहिला"
प्रेम-स्पर्श कविता
"स्पर्श हा पहिला वहिला"
----------------------
नजरेच्या या अनोख्या प्रेम -खेळात
नकळत पुढचे पाऊल पडत जाते
स्पर्शातले आपलेपण तेव्हाच कळते ,
जेव्हा दोन तनूंचे एक मन जुळते.
ही स्पर्श भावना मनातून रुजत असते
हे प्रेमाचे एक प्रतिक असते
दोन प्रेमी जीवांच्या मिलनाचा,
हा एक निकट येण्याचा संकेत असतो.
हा पहिला स्पर्श मोरपीस फिरवीत रहातो
गात्र गात्रांत वीज खेळवून तनुत पसरत रहातो
या सुंदर संगीताचा सुस्वर प्रेम रव,
हृदयातून तार छेडीत धुंद फुंद वाहतो.
जगाचे भान विसरून हे प्रेमी जीव
एका अनोख्या अनुभूतीत जगत असतात
ही स्पर्शातील जादू अनुभवण्यास ,
कितीतरी काळ मिठीत उभी असतात .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2021-शनिवार.