मित्र/मैत्रिणींनो,
फार वर्षांपूर्वी प्रेमी जनांविरुद्ध एक कायदा संमत झाला होता की, असे कुणी प्रेम कूजन करताना राजरोस सर्रास आढळले ,की त्यांना पोलीस पकडून कोठडीची हवा दाखवीत होते. काय करायचे ते तुम्ही घरी करा, चार-चौघांत नको, त्यामुळे इतरेजनांवर, मुलांवर याचा वाईट परिणाम होतो, असे कोर्टाचे म्हणणे होते. त्यामुळे पोलिसांना आणखी हे एक काम वाढले होते. असे कुणी दिसले की धर त्यांना आणि डांब तुरुंगात असे प्रकार त्यावेळी चालले होते.
या कारणास्तव आणि तुरुंगाच्या भीतीने हे प्रेमी जीव चोरून लपून छपून आपले उद्योग भीत भीत का होईना पण करत होते, लांबूनच पोलीस दिसला की चक्क पळ काढत होते. जीव मुठीतच धरून ते प्रेम करीत होते, एकमेकांना भेटत होते. अर्थात हा कायदा नंतर रद्दबातल करण्यात आला होता. प्रेमी युगुलांची त्यामुळे फारच कुचंबणा होऊ लागली होती. असो, ऐकुया तर उपरोक्त विषयावरील एक विनोदी व्यंगात्मक प्रेम कविता. कवितेचे शीर्षक आहे-" प्रेमीजनांची पहेली, पोलिसांची दंडेली !"
प्रेम-विनोदी कविता
" प्रेमीजनांची पहेली, पोलिसांची दंडेली !"
--------------------------------------
बिच्चारे प्रेमी, प्रेम करतात
या सिमेंटच्या जंगलात आडोसा शोधतात
लैला-मजनूचे नाही, हिर-रांझाचे नाही,
थोडे-थोडेसे, वेळ मिळताच करतात.
कोणतातरी कट्टा, कुठलीतरी कौलेजची पायरी
डेरेदार झाडापाठी, कधी नदीच्या काठी
प्रेमी-पाखरांचे कूजन चालते सुरांत,
प्रेमाचे पूजन चालते एकांतात.
पण आज जीवनात त्यांच्या
कुठूनसा आलाय एक खल-पुरुष
मिशांवर भरगच्च, पीळ देत,
अन हातातला जाड-जूड दंडुका फिरवीत.
या पोलिसाने उडवलीय भंबेरी
दिसले प्रेमी कि दाखवितात कोठरी
दिसताच दुरुनी काढतात पळ,
अन्यथा पाठीवर उठतील वळ.
पोलिसांची दंडेली, प्रेमी-जनांची पहेली
त्यांना कुणीही नाहीय वाली
प्रेम करतोय की चूक करतोय,
असं त्यांना वाटू लागलयं हल्ली.
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.07.2021-बुधवार.