कायदा -चारोळ्या
"कायद्यातील त्रुटी" - भाग-१
-------------------------
1) कलमे आहेत कायद्यात भरपूर
होतेय का त्यांची परिपूर्ती ?
पूर्ती होता -होता त्रुटी राहातेच,
निकालाची होते अर्धवट आपूर्ति .
2) कायदे -पंडित असा नाही निघाला
ज्याचा परिपूर्ण कायदा -अभ्यास झाला
काहीतरी कमी , काहीतरी त्रुटी,
दिसून येतात अंतिम न्यायाला .
3) कितीतरी न्याय असेच रखडले
अजुनी अन्याय होत राहिले
कलमात आहेत जरी तरतुदी,
त्रुटी जबाबदार असतात कधी -कधी .
4) न्यायालयी न्याय देणारा कायदा
असतो त्रुटींनी भरलेला सर्वदा
न्यायासाठी व्हावे लागते वंचित,
पण घडते असे क्वचित.
5) खचाखच भरले होते न्यायालय
वकिलाचा कुठेच नव्हता पत्ता
कायद्यातल्या निरविण्या बारीक -सारीक त्रुटी,
वकिलांनी घेतली होती मोठी सुट्टी .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.07.2021-शुक्रवार.