चारोळ्या पावसाच्या -भाग -९
--------------------------
1) पाऊस व माळीदादा
--------------------
आगमन होता पर्जन्यराजाचे
माळी -दादा खूप खुश होतो
चला सुट्टी मिळाले 4 महिने ,
म्हणत चक्क गावाकडे पळतो .
2) पाऊस व कळी
----------------
आगमन पावसाचे झाले
वृत्त कळीच्या कानी गेले
मग कळीची कळी खुलून ,
तिचे सुंदर फुल झाले .
3) पाऊस व मी
------------
खडतर व्रती , कठोर परिश्रमी
वज्र -दिल ,पाषाण -हृदयी असा मी
अष्ट -मासी (8 महिने ),अष्टौ -प्रहरी कार्य -विहित असामी
परी चातुर्मासी (4 महिने )पर्जन्य शिडकावा मिळता ,
नवं -नित -ही होतोय कधी कधी मी .
4) पावसाचे महत्त्व
---------------
पावसाला मी एकदा विचारलं
रोज मला भेटायला येशील ?
पाऊस हसून मला म्हणाला ,
मग माझे महत्त्व ते काय राहील !
5) पाहुणा पाऊस
---------------
एकदा पाऊस माझ्या घरी आला
सोबत सगे -सोयरेही घेऊन आला
आला तसा तो मग गेलाही ,
जाताना मला जगणे शिकवून गेला .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2021-शनिवार.