मित्र/मैत्रिणींनो,
बालगीते आणि बडबड गीते, या विषया अंतर्गत प्रस्तुत आहे माझे पहिले पुष्प. या गीताचे बोल आहेत-"अ आ आई, म म मका"
पुष्प पहिले
"अ आ आई, म म मका"
------------------------
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका.
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा.
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा.
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई.
====================
गायक - मन्ना डे
चित्रपट - एक धागा सुखाचा
संगीत - राम कदम
गीतकार - मधुसूदन कालेलकर
====================
(साभार आणि सौजन्य - आठवणीतील गाणी - मराठी बालगीते)
--------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.07.2021-रविवार.