रेल्वेचा अनोखा उपक्रम- विनोदी चारोळ्या
"वातानुकूलित रेल्वे"-(भाग-२)
------------------------------------
6) रेल्वेने काउंटर काढलाय वेगळा
वातानुकूलित तिकिटेही थंड मिळण्याचा
प्रवाश्यांचा गरम खिसा क्षणात,
थंड -गार , गारे -गार मोकळा करण्याचा.
7) थंडी पावसात फरक पडतोय
रेल्वेचा थंड डबा तोट्यात जातोय
गार्ड आणि रेल्वे चालकां -शिवाय,
संपूर्ण प्रवासभर निर्मनुष्य धावतोय.
8) घरी बायकोची असते किट -किट
ए - सीही चालत नाही नित्य -नीट
अश्यावेळी वातानुकूलित रेल्वेचा डबा,
खुणावतो मला ठेवण्या फिट .
9) घेताहेत रेल्वे चालक भरमसाट पगार
वाहनच आहे त्यांचे थंड -थंड, गारे -गार
कधीही गाडीला नाही होत उशीर,
कधीही नाही खात ते पब्लिकचा मार .
10) रेल्वेने मजल मारलीय दूरची
वेध घेतेय ती भविष्य काळाचा
तंत्रज्ञानात होतेय क्रान्ति आणि उत्क्रान्ति,
विज्ञानास आलीय वेगवान गती .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.08.2021-सोमवार.