दिशा-बंधन-चारोळ्या
" दिक-बंधन "-(भाग-१)
-----------------------
1) काळाकभिन्न जलद अवतरला अंबरी
वर्षल्या भूवरी सरींवर सरी
नाही भान , नाही "दिशांचे बंधन",
झाकोळून क्षितिजास बरसे घनघोर .
2) "बंधन" नाहीच उरले आता
मुक्त मला दाही "दिशा"
अवखळ पवनासवे फिरता पहाता,
हरवले अस्तित्त्व स्वतःस शोधिता .
3) पारतंत्र्याची झुगारून जड बेडी
महासंग्रामात निडर मारून उडी
"दिशा" स्वातंत्र्याच्या मुक्त मला,
गुलामगिरीच्या "बंधनाचा" शेवट झाला .
4) तुझे "बंधन" मला अडकवतंय
"दिशाहीन" होत मला हरवतंय
कसा प्रेमाचा पाश तुझा,
मन माझे मलाच विचारतंय .
5) "दिशाना" नूरलय कुठलेच "बंधन"
मुक्त कवेत घेतलंय गगनासही
अनंताचा वेध घेत पुढती,
कक्षा विस्तारित विसावल्या अंतरीक्षीही .
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2021-सोमवार.