मित्र/मैत्रिणींनो,
'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे"
म्हणी
क्रमांक - 8
"चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे"
------------------------------------
8) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
----------------------------------
--प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच.
--प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतातच.
--प्रत्येकाला आयुष्यात अधिकार गाजविण्याची संधी कधीतरी चालून येतेच.
--प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात.
--प्रत्येकाचा दिवस असतो.
(साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
----------------------------------------------
--प्रथम सून लहान असते तेव्हां सासूचाच घरात वरचष्मा असतो.ज्याप्रमाणें सासू अधिकार गाजवून घेते त्याप्रमाणेंच सुनेलाहि तसें वागण्याची पाळी येते, म्हणजे प्रत्येकाला अधिकाराचे दिवस कधीं ना कधीं प्राप्त होतात. पण पुढे ती मोठी होऊन तिला मुलेबाळें झाली म्हणजे ती सासूला मागे सारून आपला अधिकार गाजविते. यावरून प्रत्येकाची पाळी येतेच. वाट मात्र पाहिली पाहिजे. प्रथम सासू अधिकार गाजवून घेते, नंतर सुनेला तो अधिकार प्राप्त होतो. म्हणजे एकच अवस्था नेहमीं राहात नाहीं. प्रत्येकाचा चालता काळ केव्हां तरी येतो.
--Every dog has its day, and every man has his hour.
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.08.2021-बुधवार.