मित्र/मैत्रिणींनो,
"लावणी" या विषया-अंतर्गत एक लावणी - रचना मी प्रस्तुत करीत आहे. " किचकवध " या चित्रपटातील लता मंगेशकर , सुधीर फडके यांनी गायलेली ही लावणी आहे, या लावणीचे लावणीकार ग दि माडगूळकर आहेत व आजही ती वारंवार ऐकली जाते . लावणीचे बोल आहेत- "असा नेसून शालू हिरवा"
लावणी-रचना
क्रमांक-5
"असा नेसून शालू हिरवा"
------------------------
असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खुपसून मारवा
जाशी कुणीकडे,कुणाकडे, सखे सांग ना,
का ग बघतोस मागे पुढे ?
का रे वाटेत गाठून पुससी, का रे निलाजऱ्या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे,तुला सांगते,
त्याची माझी रे प्रीत जडे !
तुजपरी गोरी गोरी, चफ़्यावानी सुकुमारी,
दुपारचा पार ऊन जळते, ग वर ऊन जळते !
टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे,
का रे उठाठेव तिला, कळते रे तिची तिला कळते !
का ग आला असा फणकार, कंकणाच्या करीत झंकारा
जाते कुणाकडे,कुणाकडे सखे सांग ना,
का ग बघतेस मागे पुढे ?
दूर डोंगरी घुमते बासरी, चैत्र बहरला वनामधी
पदर फडफडतो, उर धडधडतो, प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घारातील युवती, लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते,
म्हणून बघते मी मागे पुढे !
========================
।गीतकार : ग. दि. माडगूळकर ।
।संगीतकार : मा. कृष्णराव ।
।गायक : लता मंगेशकर , सुधीर फडके ।
।चित्रपट : किचकवध ।
।गीतप्रकार : चित्रगीत,युगुलगीत ,लावणी ।
=========================
(साभार आणि सौजन्य-संदर्भ -आठवणीतील गाणी-लावणी)
---------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.