अनुभवी जबाबदार चारोळ्या
"केसांत पांढरी बट दिसतेय,वृद्धत्त्वाची हळू-हळू जाणीव होतेय!"
(भाग-2)
----------------------------------------------------------
(६)
शैशव,पौगंड,तारुण्य,वृद्धत्त्व
या जीवनातील एका-पाठोपाठ एक पायऱ्या
नाही चुकवू शकत कुणी एखादीही पायरी,
नियतीची आपल्यावर नजर असते करारी.
(७)
केसांतील पांढरी बट मी अजूनही राखलीय
काळ्या केसांना माझ्या वेगळीच झाक आलीय
व्यक्तिमत्त्व माझे अधिकच निखरून,
मला आज जबाबदारीची जाणीव झालीय.
(८)
हसू दे हसणाऱ्याला, चिडवू दे चिडवणाऱ्याला
म्हणू दे कोतारा ,चिडवू दे म्हातारा
त्यांनाही या अवस्थेतून जावेच लागेल,
म्हातारपण का कुणा कधी चुकेल ?
(९)
बाल्कनीत उभा राहून ते दिवस आठवतोय
ते अजाण शैशव,ते अवखळ बाल्य,ते निर्भीड तारुण्य
गत-दिनांची उजळणी करीत एका-पाठोपाठ,
वेध घेतंय भविष्याचा, नजरेतील कारुण्य.
(१०)
या पांढऱ्या बटा मला आवर्जून सांगताहेत
तारुण्य सरले, आता जरा हो तू स्थिर
तुझ्या वेगाला जरासा आवर घालून,
पुढील आयुष्यासाठी हो निग्रही, खंबीर.
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.