"विरह कविता"
---------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया एक विरह कविता. या कवितेचे शब्द आहेत-"कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं.."
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं..........
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं.
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर
डोळे लावुन बसणारं.
काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही
इतक्या सहजतेने बोलणारं.
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी
तासंतास गप्पा मारणारं.
दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं.
कुणीतरी असावं मी समजावल्यावर
मात्र न चुकता सॉरी म्हणणारं.
सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी
तर येरझाऱ्या घालणारं.
कुणीतरी असावं सोबत
आतुरतेने माझी वाटं पाहणारं.
माझ्या डोळ्यांतील भाव
बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी
डोळ्यातुन पाणी गाळणारं.
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीपोएम एस एस .ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.