पोर्नोग्राफी (अश्लील सिनेपट ) आंबट-गोड चारोळ्या
संस्कृती कुठे वाहात चाललीय,पॉर्न -इंडस्ट्री पाठी धावत चाललीय "
(भाग-2)
-------------------------------------------------------------
(६)
टी व्ही ,वा ओ टी टी , नाही सोडले कोणतेही प्लॅटफॉर्म या इंडस्ट्रीने
चांगल्या सिरीयल -पाठी दाखविले जातात हे तांबट - आंबट सिनेमे
फॅमिलीमध्ये बसण्याचीही गैरसोय करून ठेवलीय,
या पॉर्न उद्योगाने घरापर्यंतही मजल पहा मारलीय .
(७)
पैसा मिळवायचा हा अवैध मार्ग का पत्करताहेत ?
आणिक बरेचसे उद्योग जगभर उदयोन्मुख होताहेत
समाज चुकीच्या वळणावर घसरत तर चालला नाही ना ?
जिथून त्याला पाठी परतण्याचा मार्ग केव्हाच मिळेना !
(८)
पॉर्न इंडस्ट्रीच्या नावाखाली नवं नट -नट्याचे चाललेय शोषण
आमिष दाखवून पैश्याचे काढले जातात चित्रपट मोशन
सुटका नाही , त्यांचा आक्रोश जाई दबला गळ्यातच,
विद्रोहाचे हत्यार त्यांचे गाडले जाते मातीतच.
(९)
कायदा निघालाय , बऱ्याच पॉर्न -साईट्सना बसलीय खीळ
परी , दुज्या नावाखाली अजूनही सुरु आहे तिचा खेळ
विदेशात नाक्यानाक्यांवर आहेत खुली याची दुकाने,
पॉर्न कॅसेट्स भरलीत दुकानात रकानेच्या रकाने .
(१०)
बाल -गुन्हे , स्त्री -गुन्हे चाललेत वाढत समाज -विघातक कारणांनी
मुळापासून टाकावी उखडून विषवल्ली , देऊन तिज भडाग्नी
या पॉर्न इंडस्ट्रीस संपवायचे एक गुन्हा -कलम निघावे,
गुन्हेगारांस होऊन अटक त्यांना हयातभर जेलमध्ये सडवावे .
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.09.2021-बुधवार.