विषय:शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज -प्रकरणी अटक
वास्तव ड्रग्ज -विरोधी चारोळ्या
"गळाला लागताहेत छोटे मासे ,ड्रग्ज सेवन करताहेत मोठे ससे"
(भाग-१)
--------------------------------------------------------------
(1)
हा तर फक्त एक मोहरIच आहे
यापाठी एक सूत्रबद्ध कारस्थान आहे
"ड्रग्ज"-प्रकरणी अटक होतेय प्याद्यान्याच ,
पडद्या-आडचा वजीर अजुनी पडद्या-आडच आहे .
(2)
"ड्रग्ज" सेवन नाही , "ड्रग्जचे" पुरावे नाहीत
तरीही या अभावी अटक होतेय , "आर्यन खानची"
फक्त चॅट वरच नाही चालत भरोसा ठेवून ,
खऱ्या माफियांना अटक व्हावी पाळत ठेवून .
(3)
बडे बाप का यह छोटा बेटा
अरे , वडिलांचे नाव राख जरा
वडील सुपरस्टार म्हणवता तुझे ,
का तुला गर्व एव्हढा , जातोस "ड्रग्जच्या"आहारा ?
(4)
वहात चाललीय आजची तरुणाई
BACKING असेल तर जास्तच मारतात बढाई
तिजोरी भरली जरी पैश्यानी घरी ,
जाऊ नये त्यांनी या विषारी "ड्रग्जच्या" आहारी .
(5)
याना कळत नाही , आपण काय करतोय ?
"ड्रग्जचे" सेवन करून शरीराची हानीच करतोय !
भविष्य अंधारातच , नाहीय वर्तमानही ,
वर अटक होऊन तो जेलची हवा खातोय .
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.10.2021-बुधवार.