मित्र/मैत्रिणींनो,
'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"कर नाही त्याला डर कशाला"
म्हणी
क्रमांक -62
"कर नाही त्याला डर कशाला"
---------------------------
62. कर नाही त्याला डर कशाला
--------------------------
--ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे.
--ज्याने काही केलेच नाहीं त्याला भीति कशाची?
--संस्कृतपर्यायः -कर्तव्यदक्षस्य कुतो भयं स्यात्?
--जो चांगलं काम करतो त्याला कशाचीही भीती नसते.
--दोषी नसताना कसलेही भय राहत नाही.
--ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही, त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
--ज्याने वाईट काम केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही.
--ज्यांनी काही गुन्हा किंवा वाईट कृत्य केले नाही, त्याने परिणामाला घाबरण्याची गरज नाही.
--ज्या मनुष्यानें एखादा अपराध केलेला नसेल त्याला त्याबद्दलची भीति वाटण्याचे कारण नाही. ज्याच्या अंगी दोष नसतो तो उजळ माथ्यानें फिरतो. जो अपराधी असतो त्याला नेहमी धास्ती वाटत असते.
--Why should anyone who has done nothing wrong be afraid of being punished?
(साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
----------------------------------------------
--वाक्य वापर : पोलीस चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. कर नाही त्याला डर कशाला?
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.10.2021-बुधवार.