II श्री गुरु देव दत्त II
--------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज गुरुवार. श्री दत्त गुरूंचा वार. आज ऐकुया, दत्त गुरूंचे एक भक्ती गीत. या भक्ती गीताचे बोल आहेत- " झुले पाळणा रे बाळा ,अनुसया गाते "
श्री दत्त भक्ती गीत
"झुले पाळणा रे बाळा ,अनुसया गाते"
--------------------------------
झुले पाळणा रे बाळा ,
झुले पाळणा रे बाळा , अनुसया गाते
ब्रह्मा , विष्णू , महेशाला , आज जोजविते
ब्रह्मा , विष्णू , महेशाला , आज जोजविते
झुले पाळणा रे बाळा.
तीन ऋषी ब्रह्म तेज घेऊन ठाकले
रुपाआड त्यांनी माझे सत्त्व परिक्षिले
वस्त्र नको तनुवरी ,भोजन वाढते
झुले पाळणा रे बाळा , अनुसया गाते
झुले पाळणा रे बाळा.
तेज सतीचे जागले ,बाळरूप केले
तीन ऋषी ब्रह्मा , विष्णू , महेश रे झाले
सान बाळापुढे माय माउली हासते
झुले पाळणा रे बाळा , अनुसया गाते
झुले पाळणा रे बाळा.
एका पाळण्यात आता मूर्ती तीन गोड
जणू वैराग्याला आता वात्सल्याची ओढ
हातावर जणू माझ्या विश्व आंदोळते
झुले पाळणा रे बाळा , अनुसया गाते
ब्रह्मा , विष्णू , महेशाला , आज जोजविते
ब्रह्मा , विष्णू , महेशाला , आज जोजविते
झुले पाळणा रे बाळा.
गायिका : अनुराधा पौडवाल
-------------------------
(साभार आणि सौजन्य-निघालो घेवून दत्ताची पालखी-मराठी भजन)
(संदर्भ-टी-सिरीज भक्ती सागर -यु ट्यूब)
----------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.10.2021-गुरुवार.