II श्री गुरु देव दत्त II
--------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज गुरुवार. श्री दत्त गुरूंचा वार. आज ऐकुया, दत्त गुरूंचे एक भक्ती गीत. या भक्ती गीताचे बोल आहेत- "दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा "
श्री दत्त भक्ती गीत
"दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा "
------------------------------------------
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
धावत येशी भक्तांसाठी , धावत येशी भक्तांसाठी,
ब्रह्मा ,विष्णू , महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
गोड मंजिरी घुमते कानी , नाम रंगले गुरूच्या ध्यानी
गोड मंजिरी घुमते कानी , नाम रंगले गुरूच्या ध्यानी
ध्यानामधुनी तुझ्या कृपेचा गजर होतसे दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
किती वर्णू मी रूप गुरुचे , निदान माझ्या शांती -सुखाचे
किती वर्णू मी रूप गुरुचे , निदान माझ्या शांती -सुखाचे
गुरुभक्ताच्या गुरुवारी या भक्त म्हणा हो दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
गाणगापुरी जमलो सारे ,मूर्तिमंत हा दत्त पहा रे
गाणगापुरी जमलो सारे ,मूर्तिमंत हा दत्त पहा रे
काळजात हे घेऊन गारे नाम एकले दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
झोळी उघडा या हृदयाची , कास भरारे गुरुनामाची
झोळी उघडा या हृदयाची , कास भरारे गुरुनामाची
आयुष्याच्या वाटेवरती सोबत द्यावी दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
धावत येशी भक्तांसाठी , धावत येशी भक्तांसाठी,
ब्रह्मा ,विष्णू , महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
गायक : अजित कडकडे
-----------------------
(साभार आणि सौजन्य-निघालो घेवून दत्ताची पालखी-मराठी भजन)
(संदर्भ-टी-सिरीज भक्ती सागर -यु ट्यूब)
--------------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2021-गुरुवार.