विषय :नेत्यांमध्ये नेहमीच होणारे तू तू मै मै उर्फ शाब्दिक चकमकी उर्फ वाक -युद्ध
मार्मिक राजकारणी वास्तव प्रश्नार्थक चारोळ्या
"वाक-युद्धाचे प्रमाण वाढलंय, राजकारण तू तू मै मैने रंगलंय"
--------------------------------------------------------------------------
(1)
माझी कुंडली काढतोस काय ? माहिती काढतोस काय ?
थांब माझ्याकडे तुझ्याबद्दल लपविलेले प्रमाण आहे !
तू तू मै मै ,वाक -युद्ध ,शाब्दिक चकमकी रंगल्यात राजकारणात ,
दिवसाची सुरुवात अन रात्रीचा शेवट होत असतो याच विचित्र वादात !
(2)
अनुभवी ,मुरलेले ,मुरब्बी हे राजकारणी बुवा
बायांसारखे एकमेकांशी भांडत बसलेत
तुमचा IQ याचसाठी बनला आहे काय ?
तू तू मै मैच्या वाक -युद्धाने तुमचे नेतेपण /पदच हिरावून घेतलंय .
(3)
व्यासपीठावर तू तू मै मैची कव्वाली सुरु होती
दोन्ही विरोधी पक्ष तुफान सवाल -जवाब करीत होते
उखाणे -पाखIणे ,आरोप -प्रत्यारोपांना आला होता ऊत ,
राजकIरण या आधुनिक कव्वालीने , नाटकाने रंगत होते .
(4)
स्टेजवरील नेता वाक -पटू , वाक -युद्धात प्रवीण होता
आज तो बायकोकडून त्याचे धडेच घेऊन आला होता
पाहता -पाहता गाशा गुंडाळून प्रतिस्पर्धी नेत्याचा , शाब्दिक चकमकीने ,
आजच्या वाक -युद्ध चषकाचा तो मानकरी ठरला होता .
(5)
राजकारण आहे तिथेच अजुनी स्थिर होते ,प्रगतीच होत नव्हती
तू तू मै मै , वाक -युद्ध ,शाब्दिक चकमकींची नवीन वाक्ये तयार होत होती
आज लेखकांची टीम ती कागदावर उतरवून घेत होती ,
भल्या -मोठ्या ,अजस्त्र दश -खंडांची अशी आधुनिक डिक्शनरी जन्म घेत होती .
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.11.2021-रविवार.