II श्री साई बाबा प्रसन्न II
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज गुरुवार. शिर्डी निवासी माझ्या श्री साई बाबांचा वार. आज ऐकुया , साई बाबांच्या पालखीचे एक भक्ती भजन. या भजनIचे बोल आहेत - "तुझा मी दास बाबा"
साई पालखी भजन (क्रमांक-6)
"तुझा मी दास बाबा"
-------------------------------
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी
ईश्वर अल्ला सबका मालिक तूच रे साई , साई
राम रहीम कृष्ण कान्हाई तुझ्याच रे ठायी , साई
तूच माझा खंडोबा , अन तूच विठोबा
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
भोळा साई , शिव शिव साई , मनात बसला
मजला पाहून गालामध्ये खुदकन हसला
ओघळता तो गंध टिळा , हाताने पुसला
ओघळता तो गंध टिळा , हाताने पुसला
झुणका -भाकर नाही म्हणता , मजवरी रुसला
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
या हाताने घडावी साई तुझीच सेवा
दान सुखाचे लाभावे , तान्हुल्या जीव
तुझ्या चरणी हे देवा सुखाचा ठेवा
तुझ्या चरणी हे देवा सुखाचा ठेवा
निरंतर हात शिरी राहू दे देवा
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
साई तुझा महिमा ऐकुनी धन्य मी झालो
कृपा करी साईबाबा शिरडीला आलो
भजनी चिंतनी तुझ्या दंगूनी गेलो
मी ,भजनी चिंतनी तुझ्या दंगूनी गेलो
नामामध्ये साई तुझ्या रंगुनी गेलो
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
ईश्वर अल्ला सबका मालिक तूच रे साई , साई
राम रहीम कृष्ण कान्हाई तुझ्याच रे ठायी , साई
ईश्वर अल्ला सबका मालिक तूच रे साई , साई
राम रहीम कृष्ण कान्हाई तुझ्याच रे ठायी , साई
तूच माझा खंडोबा , अन तूच विठोबा
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
तुझा मी दास बाबा
तुझ्या ठायी काशी काबा
पडतो मी पाया हात जोडुनी.
II सद्गुरू साईनाथ महाराज की जय II
(साभार - साई पालखीची भजने -साई आशीर्वाद)
(सौजन्य - विंग्स म्युझिक ऑडिओ जुकबॉक्स)
(संदर्भ -यु ट्यूब - भजनगीत .वर्डप्रेस .कॉम)
----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.11.2021-गुरुवार.