II ओम गं गणपतये नमः II
--------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज मंगळवार. श्री गणेश वार. आज ऐकुया श्री गणपती भक्तीगीत . या भक्तीगीतIचे बोल आहेत- "सण गौरी गणपतीचा आला"
श्री गणेश भक्तीगीत
"सण गौरी गणपतीचा आला"
----------------------------
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
ढोल ताशांच्या संगती
मृदूंग बाजI वाजतो
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
दिन चतुर्थीचा
बघा कसा गाजतो
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
देवा लंबोदराला
पितांबर साजतो
शिरी सुवर्णाचा तो
मुकूटही शोभतो
धरतीवरी भक्ताघरी
आनंद झाला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
या पावसाच्या पडती
रिमझिम रिमझिम धारा
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
शालू हिरवा ल्याला
निसर्ग नटला सारा
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
ठायी ठायी सुखाचा
झुळझुळ वाहे वारा
आज मंगलमय हा दिन
होई होई साजरा
भक्तीमुळे मुक्ती मिळे
भक्तगणाला
भक्तीमुळे मुक्ती मिळे
भक्तगणाला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
गणरायाचा जडला
आहे मनाला छंद
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
कार्यारंभी ते पूजतात
पार्वती नंद
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
कर जोडून चरणी
जो तो होई धुंद
साऱ्या विश्वात झाला
आनंदी आनंद
धुंद होती आळविती
गजाननाला
धुंद होती आळविती
गजाननाला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
केली रोषणाई
किती हा गोड प्रसंग
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
नाचती खेळती
असा घडे सुसंग
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
भक्तिरसाचा येथे
लुटती आगळा रंग
स्तुती आरतीमध्ये हे
होती सारे दंग
छोटे बडे देवापुढे
आरती म्हणायाला
छोटे बडे देवापुढे
आरती म्हणायाला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा
नाद भिडे गगनाला
सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया.
================
गायक : प्रल्हाद शिंदे
संगीतकार : विठ्ठल शिंदे
गीतकार : दामोदर शिरवाळे
================
(साभार आणि सौजन्य-टॉप २१ धमाल गणेशगीते)
(संदर्भ-इश्तार डिव्होशनल-यू ट्यूब)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.12.2021-मंगळवार.