"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
देशभक्तिपर कविता-5
-------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया काही देशभक्तिपर कविता.
प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता---
8. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
9. या आपण नतमस्तक होऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे
नशीबवान आहे हे रक्त जे देशाच्या कामी आलं आहे
10. सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे...
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे...
जय हिन्द, जय भारत.
--लीनल गावडे
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.