विषय :कोरोनामुळे बार सारे बंद पडलेत ,आता ओपन बार सुरु झालेत
कोरोना वास्तव मार्मिक दारूचा गुत्ता (बार) चारोळ्या
"कोरोनाने बारची द्वारे बंद केलीत,आता नवीन द्वारे खुली(ओपन)झालीत"
----------------------------------------------------------------------
(1)
गावाच्या "दारूच्या गुत्त्याचा" लाईफ मेम्बर मी
"कोरोनामुळे बारवर" कायमचे सावट आलेय
काहीही होवो , बाटली नाही सोडणार , मी पिणार ,
गावच्या चावडीवरच मी नवीन "ओपन बारचे" उद्घाटन केलंय .
(2)
हे व्यसन आहे , न सुटणारे , न संपणारे
"बार बंद" पडल्यावर कासावीस झालेत , तळीराम सारे
"बारमधले" स्वातंत्र्य हिरावून घेतलंय या "कोरोनाने" , पिण्याचे ,
भले मोठे झाड निवडलंय त्यांनी पिण्यास , वट-वृक्षाचे .
(3)
पण तिथेही आहे कायम पोलिसांचा ससेमिरा
"बंद बारमध्येही" होता , आता "ओपन बारमध्येही" आहे
पण आपले लक्ष्य साध्य करण्यास माझी ,
कोणत्याही थराला जाण्याचीही तयारी आहे !
(4)
दोन पेग रिचवल्याशिवाय मला झोप येत नाही
गेल्या कित्येक वर्षांचा आहे हा परीपाठ
"कोरोनात" तरी सुधारेल हा पठ्ठा ,माझ्या बायकोला वाटतंय ,
स्वतःच उगी राहते मग ,गिरवताना पाहून मला तोच -तोच पाठ .
(5)
"कोरोना" काही जात नाही , बस्तान त्याचे वाढलंय
माझ्या "ओपन बारचे" आज आधुनिकीकरण झालंय
"कोरोना" काही जात नाही , आणि मी पिण्याचे काही सोडत नाही ,
माझ्या या "ओपन बारला" आजवर कधीच टाळे लागले नाही .
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.01.2022-रविवार.