विषय :गावात लशीकरण झालेल्यानाच रेशन आणि सातबाराचा उतारा मिळणार
मार्मिक वास्तव कोरोना चारोळ्या
"लसीकरण करा,दोन्ही डोस घ्या,अन्यथा रेशनसाठी वंचित रहा"
-------------------------------------------------------------------------
(1)
काय अजब कायदा काढलाय सरकारने कोरोनात
मुकाट घ्या लस , गुपचूप करा "लशीकरण"
जर , "लशीकरण" करण्यास तुम्ही चुकIलं ,
तर "रेशनास" आणि "सातबाऱ्यास" मुकाल ?
(2)
अरे , काय संबंध "लसीकरणाचा" आणि "रेशन -सातबाऱ्याचा" ?
गावागावांत दवंडी पिटतेय या गजब निर्णयाची
जर एखादा राहिला नजरचुकीने "लशीकरण" करण्या ,
तर त्याच्यावर येईल का वेळ उपासमारीची ?
(3)
जमिनीचा हक्क मिळणार नाही , "सातबारा" उतारा मिळणार नाही !
तलाठी ओरडला गावकऱ्यांच्या अंगावर , वसकन फिसकारला
दोन्ही लशींचे प्रमाण -पत्र ठेवा आधी टेबलावर ,
नंतरच "सातबारा" मिळेल , जमीन होईल तुमच्या नावावर !
(4)
कधी -कधी दुर्गम भागांत लशी पोचत नाहीत वेळेवर
काही -काही गावे तर अजुनी आहेत वंचित लशींसाठी
म्हणून का त्यांनी त्यांची जमीन कसणे बंद करावे ?
आणि झोपावे रात्री चक्क उपाशीपोटी ?
(5)
हे जगावेगळे नियम सरकारने ताबडतोब रद्द करावे
गावकऱ्यांच्या कलेने , त्यांचा विचार करून कार्य सांभाळावे
गरिबीचे जीवन त्यांचे , त्यांच्यावर जबरदस्ती करणे सोडावे ,
या नियमांचे कागद जाळून , ग्रामस्थांचे "लशीकरण" व्हावे !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2022-शनिवार.