विषय : सोलापूर येथे ST कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह रस्त्यावरच चूल पेटवा आंदोलन .
वास्तव -ST कर्मचारी सरकार निषेध आंदोलन चारोळ्या
"चूल मांडलीय रस्त्यावर आंदोलनाची,या अन चव घ्या झुणका-भाकरीची" --------------------------------------------------------------------
(1)
आज संसार उघड्यावर आलेला अक्षरशः पाहावयास मिळतोय
ST कर्मचारी इतकी आंदोलने करूनही , अंती खितपतच राहतोय
सरकारला आता कळूनच यावे , देत नव्हते ते हूल ,
रस्त्यावरच मांडलीय त्यांनी कुटुंबासह स्वयंपाकाची "चूल" .
(2)
आता हे तरी पाहून सरकारला , थोडी तरी दया येईल
सुकी भाकरी ,चटणी ,ठेचा खाताना पाहून त्याचे मन द्रवील
आमच्यावर आलेली ही पाळी , सरकारच्या निदर्शनास येईल ,
ST कर्मचाऱ्यांची ही आशा खरी ठरेल ,की त्यांच्या मनातच राहील ?
(3)
सर्व आंदोलने करून ST कर्मचारी आता निराश होतोय
हताशा ,असहाय्यता ,हतबलता विशेषणांचा साठा संपुष्टात येतोय
विलीनीकरणाचा विचार नाही ,मागण्याही मान्य होत नाहीत ,
"चूल" पेटवा आंदोलनावरचाही त्यांचा विश्वास आता ढळत चाललाय .
(4)
उत्साहात पेटवलेली "चूलही" आज हळूहळू थंड होत चाललीय
तिच्या ज्वाळा , तिची आग आता मंद होत चाललीय
ST कर्मचाऱ्यांच्या मनातील धुमारा ,अंगार मात्र धुमसत चाललाय ,
उद्याच्या दिनी या निखाऱ्याचा वणवा पेटायचाच शिल्लक राहिलाय .
(5)
आता जास्त ताणू नये सरकारने ,लवकरच निर्णय घ्यावा
ST कर्मचाऱ्यांच्या मागण्या ,हक्क ,अधिकार त्यांना नव्याने द्यावा
घरोघरी पुन्हा एक नवी "चूल" मांडून ,त्यांना आपलासा दिलासा द्यावा ,
वसुधैव कुटुंबकम ,एकमेका साहाय्य करुचा सर्वा अनुभव यावा .
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2022-शनिवार.