II जागतिक महिला दिन II
कविता क्रमांक-1
--------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
उद्या दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त काही कविता---
जागतिक महिला दिन---
आज या दिनाला महिला दिनाला
सलाम तुमच्या विश्व कार्याला
साजरा करू या महिला दिन
अगाध कार्य करुन स्मरण
जगात तुमचे अग्रस्थान
विश्वात लाभला तुम्हा बहुमान
अनंत संकटे करुनी पार
यशस्वी झाल्या जगभर
संघर्ष तुमचा जीवनभर
ध्येयाचे तुम्ही गाठले शिखर
भेदभाव सारे मिटले
कार्य करण्याला धैर्य मिळाले
दिव्य स्वप्न साकार झाले
जगास तुमचे भाग्य लाभले
रण रागिनी तुम्ही मर्दानी
शौर्यगाथा तुमची रणांगनी
जिद्द, चिकाटी बहुगुणी
खंबीर, कणखर नेतृत्व करुनी
अखंड कार्य तुमचे भारी
पृथ्वी, चंद्रावर तुमची स्वारी
अगाध शक्ती तुमची नारी
प्रेरणादाई तुम्ही जग उद्धारी
स्वातंत्र्य, समता, संधी समान
न्याय, एकता, सर्वसमान
समाज सेवेला देह झिजवून
जगात उंचावली मान
देश रक्षणाला कटिबद्ध झाल्या
वीरांगना म्हणुनी जगात गाजल्या
चारी दिशानी कीर्ती पसरली
विश्व कुटुंबाला आधार झाली
कला, क्रीड़ाने, मैदाने गाजविली
सर्वांगीण प्रगती साधली
विश्वनारी म्हणून शोभल्या
विजयी सलामी तुमच्या कार्याला.
--संजय रघुनाथ सोनावणे
----------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2022-सोमवार.