स्वर्गलोगचा फोन नंबर शोधू कुठे
माझी आई गेली आहे तिथे,
माझं पोठ दुखतय व मी खाली पडले
मला आई पाहिजे लगेचच्या लगेच
ऑपरेटर, तुम्ही सांगा ना मला समजावून
डिरेक्टरी मधून तिचा नंबर कसा काढू शोधून
स्वर्गलोगचे नंबर का पिवळ्या भागात शोधू
मला समजतच नाही मी कुठे कुठे पाहू.
मला माहित आहे, आई पण पाहिजे बाबांना
कारण मी ऐकते रोज रात्री त्यांना रडताना
मी ऐकते त्यांना आईला हाक मारताना
रोज रात्री झोपायला जाताना
कदाचित मी तिला फोन केला तर
ती घरी येऊ शकेल लवकर
स्वर्गलोक का खूप लांब आहे?
का ते समुद्रापली कडे आहे?
खूप खूप दिवस झाले जाऊन आईला
आता घरी यायलाज पाहिजे तिला
मला खरच तिझ्याशी बोलायचंय
पण कळत नाही हे कसं करायचं
प्लीज मला तिचा नंबर द्या शोधून
माझे डोळे खूप दुखतायत रडून
मला हे मोठे शब्द नाही समजत वाचून
माझं वय फक्त सातच आहे ना म्हणून
ऑपरेटर, काय झालं तुम्हाला
तुम्ही रडताय, मला येतंय ऐकायला.
का तुमचं पण पोठ दुखत आहे
आणि आई उचलून नाही घेत आहे
मी देवळात फोन करून बघू
त्यांना माहीत असेल का ते पाहू
आई म्हणायची आपल्याला कुठलीही मदत लागली
तर पहिले देवळाची पाहिरी पाहिजे चडली
मला देवळाचा नंबर आहे माहित
आहे लिहिलेला आईच्या डायरीत
ऑपरेटर आपले खूप खूप आभार
मी देवळात फोन करून विचारते आज....
- शशांक