II होळी II
पारंपरिक खाद्यपदार्थ क्रमांक-3
----------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.
3. गुजिया (Gujiya)
--------------------
गुजिया हा पदार्थ होळीसाठी भारतात अनेक ठिकाणी केला जातो. राजस्थानात गुजिया या पक्क्वान्नाला एक महत्त्वाचं स्थान आहे. यासाठी आम्ही तुमच्यासोबत अंजिर गुजिया कशा तयार करतात हे शेअर करत आहोत.
गुजिया तयार करण्याचे साहित्य---
एक कप मैदा, दोन मोठे चमचे तूप आणि एक चिमुट मीठ.
सारणाचे साहित्य---
पाऊण कप वाटलेले अंजीर, पाच मोठे चमचे पिठीसाखर, दोन मोठे चमचे वाटलेले खजूर, दोन चमचे काजूपूड, दोन चमचे बदामपूड, पाव चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, तळण्यासाठी तेल.
गुजिया तयार करण्याची कृती---
गॅसवर कढईत एक चमचा तूप टाका. त्यात खजूर, अंजीर टाकून परतून घ्या. त्यात पिठीसाखर, ड्रायफ्रुट पावडर टाकून मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करा आणि वरून वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाका. मैदा, मीठ आणि तूप एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. अर्धा तासाने या पीठाचे छोटे छोटे गोळे तयार करा त्याला पारीचा आकार देऊन त्यात स्टफिंग भरा. पुरीच्या दोन्ही कडांना पाण्याचा हात लावून त्यांना अर्धचंद्राकार आकाराने बंद करा. तेल तापवा आणि त्यात अर्धचंद्राकृती गुजिया तळून घ्या.
--तृप्ती पराडकर
---------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.