II होळी II
शुभेच्छा क्रमांक-8
------------------
मित्र/मैत्रिणींनो,
काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.
रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
झाडे लावा, झाडे जगवा होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
--होळीच्या हरित शुभेच्छा
भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खेळ असा रंगला गं खेळणारा दंगला
टिपरीवर टिपरी पडे लपून छपून गिरिधारी
मारतो गं पिचकारी रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारात न्हाला
--आज आनंदी आनंद झाला
–जगदीश खेबुडकर
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग,
चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो
--तुम्हाला होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
आला रंगांचा सण.
मौज मस्ती धुमशान.
आज घराघरात पुरण पोळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
--होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी
--तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत.
जुनी पानॆ गळून
नवी पालवी मिरवीत आहॆत,
रंग-बेरंगी रंगाची
उधळण करीत आहॆत,
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकून तुम्ही ही,
रंगा-रंगार-रंगुन जा
--!!हॊळीच्या हार्दिक शुभॆच्छा!!
--मराठी स्टाईल
---------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.